marathi corner

Tuesday, November 8, 2011

sanchalan geet

charan chaloo de sadaa dhyeyamandiraakaDe
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागू दे !!धृ!!
गती मती द्युती तुझी आमुच्यात येऊ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको आम्ही असू सदा खडे!!१!!
पाहुनी सभोवती दु:ख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागीलीस संपदा
दंभ मोह लाजले पाहता तुझ्याकडे !!२!!
चरण धुंद चालू दे वेग त्यास येऊ दे
ध्येयमाम्दिरावारी दृष्टी अढळ असू दे
मावच घालूनी स्मृती सिद्ध संगरा खडे!!३!!
धुळीच्या कणातुनी घोष हा उठे महा
स्पर्श होऊनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूती सापडे!4!!

Saturday, November 5, 2011

sfurtigeete(34)

chiravijayaache waaraws aamhee 
कर्तव्याचे पूजक आम्ही 
चीराविजायाचे वारस आम्ही !!धृ!!
व्याक्तीसुखाचे पाश तोडूनी,ध्येयपथावर युवक चालले 
अविरत अमुच्या तप्स्येतुनी,संघटनेचे तत्व उदेले 
संघटनेचे सेवक आम्ही !!१!!
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे 
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे 
ध्येयपथावर सैनिक आम्ही !!२!!
खडतर असले वाण घेतले स्वेच्शेने तर आम्ही आमुच्या 
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयात्नातुनी घडेल आमुच्या 
पराक्रमाचे पाईक आम्ही!!३!!
तमा न आम्हा कळीकाळाची केवळ आमुचे कार्य करू 
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरू
चीर्विजायाचे वारस आम्ही!!४!! 


Thursday, November 3, 2011

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे
उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे !!धृ!!
पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे
नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे
गेली सहस्र वर्षे लढलो न थांबताही
गझनी  शिकान्दाराची उरली न मृतीकाही 
आम्ही कालापुत्र आम्हा येईल मान कैचे !!१!!
जगतात येउनी जे गेले अनेक देश 
क्षणमात्र रोम जैसा दिपवीतसे जगास 
नाही त्यास जगती अमरत्व प्राप्त झाले 
ते ज्ञान ती कला ते सर्वस्व नष्ट झाले 
आम्हीच पाहीयेले ते आदी अंत त्यांचे !!२!!
जरी कालकूट प्यालो तरी नाही मृत्यू आम्हा 
अग्नीत पद्मिनीचा जळतो कधी न आत्मा 
दाहीर कन्याकांचे जरी देह आज नुरले 
आत्मे जरी तयांचे अतिदिव्यारूप झाले 
ते प्राण आमुचे अन आम्ही प्राण या जगाचे !!३!!
हे राष्ट्र संकटांशी लढले अनेक वेळा 
कोणी न जिंकले हे भासे अजेय काला 
आदर्श जीवनाचा हा वृक्ष मार याला 
जरी तोडिले बलाने तरी स्पर्शितो नभाला 
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे!!४!!
हे चिन्मयी भारतभू जगतास ज्ञान देता 
जी देवाजान्माभूमी धर्मास ग्लानी येता 
ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना 
जी कालीरूप घेते दुष्टास शासाताना 
या माउलीस अर्पू गुरूस्थान या जगाचे !!५!