marathi corner

Showing posts with label saMchalan geet. Show all posts
Showing posts with label saMchalan geet. Show all posts

Tuesday, November 8, 2011

sanchalan geet

charan chaloo de sadaa dhyeyamandiraakaDe
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागू दे !!धृ!!
गती मती द्युती तुझी आमुच्यात येऊ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको आम्ही असू सदा खडे!!१!!
पाहुनी सभोवती दु:ख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागीलीस संपदा
दंभ मोह लाजले पाहता तुझ्याकडे !!२!!
चरण धुंद चालू दे वेग त्यास येऊ दे
ध्येयमाम्दिरावारी दृष्टी अढळ असू दे
मावच घालूनी स्मृती सिद्ध संगरा खडे!!३!!
धुळीच्या कणातुनी घोष हा उठे महा
स्पर्श होऊनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूती सापडे!4!!