marathi corner

Showing posts with label dasaraa. Show all posts
Showing posts with label dasaraa. Show all posts

Monday, October 3, 2011

sfurtigeete(19)

घुमवीत दुंदुभी तुतारीचा ललकार  

घुमवीत दुंदुभी तुतारीचा ललकार 
हा विराट पुरुषा ,तुझाच जयजयकार!धृ!
कोटी कोटी तव स्फुल्लिम्गातून शिवशक्तीचा प्रत्यय येउनी 
संस्कृतीचा गंगोघ निर्मुनी  हा घडे समाष्टीजीवन साक्षात्कार !१!
ध्वज भगवा सद्गुरू सनातन फडकत गगनी राहील निरंतर 
केले ज्यांनी जीवन अर्पण हा उठे तयांचा भूमीतूनी पुकार !!२!!
छातीस भिडली छाती जेथे धूळ चारली शत्रूस इथे 
भूमी रक्षणी पडले जेथे हा तेथून उठला अंतरीचा हुंकार !!३!!
अंत:करणी तेच प्रतिध्वनी तोच एक स्वर उठवू गगनी 
होऊ सिद्ध या विजयादिनी हा रणचंडीचा रुद्ररूप अवतार!!४!!