तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही दाही
तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाहि दाही।धृ।।
स्मिताने तुझ्या विश्व तेजे भरेल ,तमाचे कुठे नाव तेव्हा उरेल
मुखातून ये ना जरी शब्द काही,अभागी जाणा या तरी यापुढे
तुझे धीर गंभीर ते शब्द कानी अजुनी अम्हा देती उत्साह कार्यी
पुढे चालवू कार्य तुझे सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।१।।
समाधी तुझी ही इथे बांधीलेली ,म्हणूनीच भूमी असे पुण्याशाली
हवेचा इथे हा अणूरेणू पूर्ण,तुझ्या आत्मतेजे असे दिप्तीपूर्ण
समाधिस्थ होता तुवा हा दिलेला ,करातील तो दीप आम्ही धरीला
पुढे चालवू कार्य तूझें सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।२।।
स्मृतीने तुझ्या मात्र अश्रू गळावे,सुचावे न काही मनाशी रडावे
पुसूनीच अश्रू पुढे जावयाते तुझा याचितो स्पर्श मी एक हाते
मुखी नाम राहो सदा केशवाचे ,तरुनीतडा अश्मही जावयाचे
प्रसादे तुझ्या शक्ती ती अंगी येवो समाधीपुढे प्रार्थना हीच होवो ।३।।
sfurtigaan-bharatiya vichaar saadhanaa pune prakaashan yaatun saabhaar.
ReplyDelete