अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे
अमूर्त मूर्त तुजसमान होऊ दे
येत शरण्तव पदांसी देशकार्यी विरमूदे!!धृ!!
उमलतील ह्या कळ्या हळूहळूची पाकळ्या
तव सुगंध तुजसमान सर्वदूर पसरू दे ।।१।।
पुष्पपले नको आम्हासी अर्पू दे तुझ्या पदांसी
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेची होऊ दे ।।२।।
आम्हासी तूच ध्येय देव सेवू धरुनी भक्तीभाव
पूजने तुझ्या आम्हास देवरूप होऊ दे ।।३।।
अससी भव्यदिव्य दीप,तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही हृदयांतरी उजळू दे।।४।।
करुनिया तुझ्यासमान ओऊ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतीचे संरक्षणची होऊ दे।।५।।www.laibhaaree.com

No comments:
Post a Comment