marathi corner

Tuesday, November 8, 2011

sanchalan geet

charan chaloo de sadaa dhyeyamandiraakaDe
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागू दे !!धृ!!
गती मती द्युती तुझी आमुच्यात येऊ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको आम्ही असू सदा खडे!!१!!
पाहुनी सभोवती दु:ख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागीलीस संपदा
दंभ मोह लाजले पाहता तुझ्याकडे !!२!!
चरण धुंद चालू दे वेग त्यास येऊ दे
ध्येयमाम्दिरावारी दृष्टी अढळ असू दे
मावच घालूनी स्मृती सिद्ध संगरा खडे!!३!!
धुळीच्या कणातुनी घोष हा उठे महा
स्पर्श होऊनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूती सापडे!4!!

Saturday, November 5, 2011

sfurtigeete(34)

chiravijayaache waaraws aamhee 
कर्तव्याचे पूजक आम्ही 
चीराविजायाचे वारस आम्ही !!धृ!!
व्याक्तीसुखाचे पाश तोडूनी,ध्येयपथावर युवक चालले 
अविरत अमुच्या तप्स्येतुनी,संघटनेचे तत्व उदेले 
संघटनेचे सेवक आम्ही !!१!!
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे 
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे 
ध्येयपथावर सैनिक आम्ही !!२!!
खडतर असले वाण घेतले स्वेच्शेने तर आम्ही आमुच्या 
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयात्नातुनी घडेल आमुच्या 
पराक्रमाचे पाईक आम्ही!!३!!
तमा न आम्हा कळीकाळाची केवळ आमुचे कार्य करू 
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरू
चीर्विजायाचे वारस आम्ही!!४!! 


Thursday, November 3, 2011

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे
उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे !!धृ!!
पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे
नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे
गेली सहस्र वर्षे लढलो न थांबताही
गझनी  शिकान्दाराची उरली न मृतीकाही 
आम्ही कालापुत्र आम्हा येईल मान कैचे !!१!!
जगतात येउनी जे गेले अनेक देश 
क्षणमात्र रोम जैसा दिपवीतसे जगास 
नाही त्यास जगती अमरत्व प्राप्त झाले 
ते ज्ञान ती कला ते सर्वस्व नष्ट झाले 
आम्हीच पाहीयेले ते आदी अंत त्यांचे !!२!!
जरी कालकूट प्यालो तरी नाही मृत्यू आम्हा 
अग्नीत पद्मिनीचा जळतो कधी न आत्मा 
दाहीर कन्याकांचे जरी देह आज नुरले 
आत्मे जरी तयांचे अतिदिव्यारूप झाले 
ते प्राण आमुचे अन आम्ही प्राण या जगाचे !!३!!
हे राष्ट्र संकटांशी लढले अनेक वेळा 
कोणी न जिंकले हे भासे अजेय काला 
आदर्श जीवनाचा हा वृक्ष मार याला 
जरी तोडिले बलाने तरी स्पर्शितो नभाला 
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे!!४!!
हे चिन्मयी भारतभू जगतास ज्ञान देता 
जी देवाजान्माभूमी धर्मास ग्लानी येता 
ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना 
जी कालीरूप घेते दुष्टास शासाताना 
या माउलीस अर्पू गुरूस्थान या जगाचे !!५! 

Sunday, October 23, 2011

sfurtigeete(31)

एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान

एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान
 देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण !!धृ!१
एक आमुची आई भारत आम्ही लेकरे सारी
भारत देश हा देव अमुचा आम्ही सर्व पुजारी!!१!!
भरतखंड हा सागर आम्ही बिंदू जलाचे त्यात
किरणेआम्ही भारत अमुचा तळपले सूर्य नभात
आम्ही सगळे एक आमुचा एक असे अभिमान!!२!!
असंख्य प्पाने आणीत शाखा वृक्ष तरीही एक
हजार जाती पंथ लक्ष तरी पिंड आमुचा एक
आम्ही सगळे एक कुणी नाच रंक राव धनवान !!३!!
मनामानातुनी देशभक्तीची ज्योत तेवते एक
देह भिन्न तरी नासानासातुनी रक्त खेळते एक
आम्ही सगळे एक आमुचे भगवे एक निशाण !!४!!

Saturday, October 22, 2011

sfurtigeete(30)

यश तुझे झळकू दे दिगंतरी तू  विसरू नकोस राष्ट्राला तरी 

यश तुझे झळकू दे दिगंतरी तू विसरू नकोस राष्ट्राला तरी!!धृ!!
जीवनाकालीका पूर्ण फुलू दे पावित्र्याचे तेज चढू दे 
देशाप्रीतीचा गंध चढू दे जीवन होई व्यर्थ ना तेई !!१!!
विसर जीवाला नाच ह्येयाला विसर घराला नाच देशाला 
विसरू नको रे परंपरेला उजवा मनी इतिहास धरी !!२!!
भूल पडावी भ्याडपणाची भूल पडावी अहंपणाची 
भूल नको पण कर्तव्याची स्वार्थाची ती भूल बरी!!३!
धगधगती तत्वावर निष्ठा मन जीवाची हीच प्रतिष्ठा
 अनुसारातील जन  कळूनी येता तत्वापुजारी खरोखरी!!४!!

Friday, October 21, 2011

sfurtigeete(29)

उचलतो  म्हणुनी belabhaDaar 

उचलतो म्हणुनी belbhanDaar !!धृ!!
 यवनांनी थैमान मांडुनी 
स्वद्श लुटला दो हातांनी 
प्रतिकाराला पुढे न कोणी
 उच्चेदाचे सत्र चालले चहूकडे अनिवार !१!
दास्याचा ये संतत प्रत्यय 
कर्तृत्वाचा करती विक्रय
शक्तीयुक्तीने बांधव निर्भय
यवनांचे उभविती मनोरे काय विचीत्र प्रकार!!२!!
परतविण्या ही लाट यावनी 
राजपूत बांधव मेले लढुनी
शिंपियाली रक्ताने अवनी
व्यर्थची का जाऊ द्यावे भगिनीचे  जोहार !!३!!
सत्तेचा जो उलटे फासा 
बुडे धर्म संस्कृती स्वभाषा 
दिसे जीवनी कुणा न अशा 
फुअवायाला पुन्हा साजे मी स्वत्वाचा अंगार!!४!!
तन मन धन हे सर्व समर्पून 
ध्येयातच झिजाविणार जीवन 
विश्रांतीचे विचार सोडून 
क्रांतीने स्वातान्त्र्यादेवीचे घुमाविणार प्राकार !५!
तैन भंगूनि रिपू सिंहासन 
धुलीमालीन ह्वाज उंच उभारीत 
हिन्दुवन्शाचा दणका घुमावीन 
काय कमी रायारेश्वरा तव असल्यावर आधार!!६!!


Thursday, October 20, 2011

sfurtigeete(27)

व्हावे जीवन यज्ञसमरपण 
सामिधामय ही काया साधन !!धृ!!
अभिमानाची फुंकर मारून इद्रित वन्ही पुन:श्च फुलवून 
दिव्या नभासी ज्वाला भिडवून तेजे भरण्या अपुले जीवन!!१!!
दारूण हे रणआज पेटले भयाण कंदन की जरी घडले
 मोह मनीचे टाकुनी दिधले प्रतिकाराचा घेउनी प्राण !१२!!
राहुनी निर्भर बाहुबलावर धरी सुदर्शन श्रीहरीचा कर 
शार्ड.गधनुचा नाद भयंकर पामचाजन्य रणभेरी फुंकून !!३!!
एकमात्र ही गीता गाऊन याज्ञासाम्गता ऋत्विज होऊन 
अर्पित अवघे तनमनधन याज्ञारूप हे करण्या जीवन !!४!!
बांधून मंदिल पुरुषार्थाचा सज्ज जाहला रथ ध्येयाचा 
कोट उभारून संघशक्तीचा  धर्मराज्य हे करण्या स्थापन!१५!!