marathi corner

Thursday, October 20, 2011

sfurtigeete(27)

व्हावे जीवन यज्ञसमरपण 
सामिधामय ही काया साधन !!धृ!!
अभिमानाची फुंकर मारून इद्रित वन्ही पुन:श्च फुलवून 
दिव्या नभासी ज्वाला भिडवून तेजे भरण्या अपुले जीवन!!१!!
दारूण हे रणआज पेटले भयाण कंदन की जरी घडले
 मोह मनीचे टाकुनी दिधले प्रतिकाराचा घेउनी प्राण !१२!!
राहुनी निर्भर बाहुबलावर धरी सुदर्शन श्रीहरीचा कर 
शार्ड.गधनुचा नाद भयंकर पामचाजन्य रणभेरी फुंकून !!३!!
एकमात्र ही गीता गाऊन याज्ञासाम्गता ऋत्विज होऊन 
अर्पित अवघे तनमनधन याज्ञारूप हे करण्या जीवन !!४!!
बांधून मंदिल पुरुषार्थाचा सज्ज जाहला रथ ध्येयाचा 
कोट उभारून संघशक्तीचा  धर्मराज्य हे करण्या स्थापन!१५!!

No comments:

Post a Comment