marathi corner

Showing posts with label complete. Show all posts
Showing posts with label complete. Show all posts

Sunday, October 23, 2011

sfurtigeete(31)

एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान

एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान
 देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण !!धृ!१
एक आमुची आई भारत आम्ही लेकरे सारी
भारत देश हा देव अमुचा आम्ही सर्व पुजारी!!१!!
भरतखंड हा सागर आम्ही बिंदू जलाचे त्यात
किरणेआम्ही भारत अमुचा तळपले सूर्य नभात
आम्ही सगळे एक आमुचा एक असे अभिमान!!२!!
असंख्य प्पाने आणीत शाखा वृक्ष तरीही एक
हजार जाती पंथ लक्ष तरी पिंड आमुचा एक
आम्ही सगळे एक कुणी नाच रंक राव धनवान !!३!!
मनामानातुनी देशभक्तीची ज्योत तेवते एक
देह भिन्न तरी नासानासातुनी रक्त खेळते एक
आम्ही सगळे एक आमुचे भगवे एक निशाण !!४!!

Saturday, October 22, 2011

sfurtigeete(30)

यश तुझे झळकू दे दिगंतरी तू  विसरू नकोस राष्ट्राला तरी 

यश तुझे झळकू दे दिगंतरी तू विसरू नकोस राष्ट्राला तरी!!धृ!!
जीवनाकालीका पूर्ण फुलू दे पावित्र्याचे तेज चढू दे 
देशाप्रीतीचा गंध चढू दे जीवन होई व्यर्थ ना तेई !!१!!
विसर जीवाला नाच ह्येयाला विसर घराला नाच देशाला 
विसरू नको रे परंपरेला उजवा मनी इतिहास धरी !!२!!
भूल पडावी भ्याडपणाची भूल पडावी अहंपणाची 
भूल नको पण कर्तव्याची स्वार्थाची ती भूल बरी!!३!
धगधगती तत्वावर निष्ठा मन जीवाची हीच प्रतिष्ठा
 अनुसारातील जन  कळूनी येता तत्वापुजारी खरोखरी!!४!!

Friday, October 21, 2011

sfurtigeete(29)

उचलतो  म्हणुनी belabhaDaar 

उचलतो म्हणुनी belbhanDaar !!धृ!!
 यवनांनी थैमान मांडुनी 
स्वद्श लुटला दो हातांनी 
प्रतिकाराला पुढे न कोणी
 उच्चेदाचे सत्र चालले चहूकडे अनिवार !१!
दास्याचा ये संतत प्रत्यय 
कर्तृत्वाचा करती विक्रय
शक्तीयुक्तीने बांधव निर्भय
यवनांचे उभविती मनोरे काय विचीत्र प्रकार!!२!!
परतविण्या ही लाट यावनी 
राजपूत बांधव मेले लढुनी
शिंपियाली रक्ताने अवनी
व्यर्थची का जाऊ द्यावे भगिनीचे  जोहार !!३!!
सत्तेचा जो उलटे फासा 
बुडे धर्म संस्कृती स्वभाषा 
दिसे जीवनी कुणा न अशा 
फुअवायाला पुन्हा साजे मी स्वत्वाचा अंगार!!४!!
तन मन धन हे सर्व समर्पून 
ध्येयातच झिजाविणार जीवन 
विश्रांतीचे विचार सोडून 
क्रांतीने स्वातान्त्र्यादेवीचे घुमाविणार प्राकार !५!
तैन भंगूनि रिपू सिंहासन 
धुलीमालीन ह्वाज उंच उभारीत 
हिन्दुवन्शाचा दणका घुमावीन 
काय कमी रायारेश्वरा तव असल्यावर आधार!!६!!


Thursday, October 20, 2011

sfurtigeete(27)

व्हावे जीवन यज्ञसमरपण 
सामिधामय ही काया साधन !!धृ!!
अभिमानाची फुंकर मारून इद्रित वन्ही पुन:श्च फुलवून 
दिव्या नभासी ज्वाला भिडवून तेजे भरण्या अपुले जीवन!!१!!
दारूण हे रणआज पेटले भयाण कंदन की जरी घडले
 मोह मनीचे टाकुनी दिधले प्रतिकाराचा घेउनी प्राण !१२!!
राहुनी निर्भर बाहुबलावर धरी सुदर्शन श्रीहरीचा कर 
शार्ड.गधनुचा नाद भयंकर पामचाजन्य रणभेरी फुंकून !!३!!
एकमात्र ही गीता गाऊन याज्ञासाम्गता ऋत्विज होऊन 
अर्पित अवघे तनमनधन याज्ञारूप हे करण्या जीवन !!४!!
बांधून मंदिल पुरुषार्थाचा सज्ज जाहला रथ ध्येयाचा 
कोट उभारून संघशक्तीचा  धर्मराज्य हे करण्या स्थापन!१५!!

sfurtigeete(26)

राष्ट्रोन्नती एक मात्र ध्यान हेच चालू  दे
राष्ट्रोन्नती एक मात्र ध्यान हेच चालू दे 
आश्त्राजीवानात जीव जीवनांत पाहू दे!!धृ !!
सोड भोग मोह स्वार्थ देह तुझा झिजो परार्थ 
चंदनी सुगंध मंद आसमंत भरू दे !!१!१
ध्येयाभाव जो मनात येऊ दे तुझ्या कृतीत
 कार्याची किर्तीध्वजा दूरदेशी फडकू दे!!२!!
कर्मयोग हा ज्वलंत स्वीकारी तू नितांत 
दिव्या तुझ्या हवनातूनी दीपमाळ उजळू दे!१३!!
नकोत अन्य यज्ञ याग त्याग हाच मान याग 
बंदिवान आत्मतेज ,आज मुक्त होऊ दे!!४!!

Sunday, October 16, 2011

sfurtigeete(24)

हा अखंड नंदादीप जळणार,सतत जळणार
हा असाच तेवत जगती ,नीज प्रकाश नित्य देणार!धृ !
जळत जळत जरी आत्मनाश हो,जीवन सार्थकता ही 
घोरानिराशातामाविनाश हो ध्येय अंतरी राही 
हा प्रदीप्त नंदादीप अवनीस प्रकाशाविणार!१!
चिरकाल जळत असणे इतरांसही चेतविणे 
हे कार्य सतत करणे दशदिशा प्रकाशाविणे 
आकांक्षा धरुनी चित्ती हा जळत जळत जळणार !!२!!
प्रलय वादळी मूळी न थरथरे असे ज्वलंत 
ज्वालामुखीपरी वरुनी शांत हा दया क्षमा ठेवी थोर
गंभीर मनी खंबीर प्रज्वलित राष्ट्र करणार !!३!!
एक दीप दुसर्यास चेतवी ऐसे आणि होती
जागृत हा राष्ट्रास जागवी देऊने जीवनास्फुर्ती 
हा एकाच नंदादीप पण दीपमाळ करणार!!४!!

sfurtigeete(23)

tech  खरोखर विजयी   जीवन   

राष्ट्रास्तव जे झिझाले कणाकण तेच खरोखर विजयी जीवन!!धृ !!

आपत्तींशी सतत झुन्जूंनी निंदेचे शर प्रखर सोसुनी 
जनजननीचे पूजन करी जे निजाप्राणांचे करुनी निरांजन !!१!!
हिंदुभूमिचे कुणी कंठमणी असती परी जे पैंजण होऊनी 
तिच्या यशाची गाता गाणी निशिदिन वादाती रुणाझूनरुणझुण!!२!!
राजावैभावा जे न भाळले संस्कृतीकार्या फळले फुलले 
सत्ता मदिरा त्यजुनी सजले करण्या सेवागांगासेवान !!३!!
विश्वाचा हा विशाल बाग,स्वदेश शोभो सजीव भाग 
असे जाणुनी करुनी त्याग देशाचे जे करी नंदनवन !!४!!
बुद्धीदास्य विषमता विनाशक दानावतेचे दुर्ग भयानक 
वरुनी आले वीराव्रती  जे चराचराचे करी संजीवन!!५!!
यज्ञातील जे सीधा झाले जीवनास त्या बंधन कसले
 दुर्बलतेचे पाश गळाले,करी जे ऐसे सीमोल्लंघन !!६!!


Tuesday, October 11, 2011

sfurtigeete(22)

apulyaa dhyeyaawaratee asoo de dRuShTee tujhee re puree
अपुल्या ध्येयावरती असू दे दृष्टी तुझी रे पुरी!धृ!

प्रवास करीता आयुष्याचा मार्गी तव रे बागबगीचा 
सुगंध आणिक रंग फुलांचा भुरळ पाडिती जरी!!१!!
असंख्य पर्वत तुझ्याभोवती अथांग सागर जरी खवळती 
तनु थारारूनी तुझी टाकिती धीर मनी रे धरी!!२!!
मार्गी कंटक तुला बोचतील तेचा तैशा अनेक बसतील 
प्रसंग नाना,निराश करतील भिऊ नको तू परी !!३!!
मार्गी तुजला मिळेल सोबत आक्रम मार्ग तयासोबत 
जरी गळाली मार्गी सोबत थांबू नको तू तरी!!४!!
थकशील रस्त्यामध्ये चालुनी हिम्मत परी अंगात आणुनी 
निज्ध्येयाला देव मानुनी ठेवी भाव त्यावरी!!५!!

Friday, October 7, 2011

sfurtigeete(21)

nowjawaan सैनिका उचल पाउला 
पुढे चला पुढे चला ध्वनी निनादला !धृ!
मायदेश आपुला स्वतंत्र जाहला 
उच्च कीर्तीशिखारी चढविण्यास त्याजला 
व्हा तयार व्हा तयार !घोष जाहला!१!
शिवाजी शूर बाजी वीर बापू गोखंले 
प्रताप थोर समरवीर अमर जाहले 
ती उदात्त भव्य दिव्या स्मार परंपरा !२!
टिळक केशव नरेंद्र थोर अग्रणी 
रंगले स्वदेश्कार्यी स्वार्थ त्यागुनी 
त्यासमान एव मान देश आपुला !३!
मार्ग तव तुला जरी भयाण वाटला 
विपत्तीचा गिरी जरी समोर थकला 
बेधडक तू दे धडक नि फोड त्याजला!४!!