kaavya 
की गाणे 
पद्य हवे तुज पद्य हवे , 
पद्यातून संसारातील गद्य हवे पण ,
मधात घोळून कटू गद्य तुला मी सांगावे 
तुपात तळले कडू कारले तुल वाटते ऐकावे  
शब्दांना मुली गंध न उरला,
माल मसाला वारी लावता वासही सरला ,
शब्द बोलके एके काळी ,आज तसे ते नसती, 
काटकुळ्या जणू कोणी महिला नऊवारी नेसती ,
नकाच लावू चाल कोणीही मम काव्याला,
नकोच संगीत साज तयाला चढवायाला,
अर्थशून्य जरी मुळात माझे असेल काव्य ,
गीत ऐकता म्हणतील आहे खूपच गेय