marathi corner

Friday, April 27, 2012

sfurtigeete42

अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे 

अमूर्त मूर्त तुजसमान होऊ दे 
येत शरण्तव पदांसी देशकार्यी विरमूदे!!धृ!!
उमलतील ह्या कळ्या हळूहळूची पाकळ्या 
तव सुगंध तुजसमान सर्वदूर पसरू दे ।।१।।
पुष्पपले नको आम्हासी अर्पू दे तुझ्या पदांसी 
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेची होऊ दे ।।२।।
आम्हासी तूच ध्येय देव सेवू धरुनी भक्तीभाव 
पूजने तुझ्या आम्हास देवरूप होऊ दे ।।३।।
अससी भव्यदिव्य दीप,तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही हृदयांतरी उजळू दे।।४।।
करुनिया तुझ्यासमान ओऊ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतीचे संरक्षणची होऊ दे।।५।।www.laibhaaree.com

Monday, April 9, 2012

sfurtigeet41

तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही दाही


तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाहि दाही।धृ।।

स्मिताने तुझ्या विश्व तेजे भरेल ,तमाचे कुठे नाव तेव्हा उरेल 
मुखातून ये ना जरी शब्द काही,अभागी जाणा या तरी यापुढे 
तुझे धीर गंभीर ते शब्द कानी अजुनी अम्हा देती उत्साह कार्यी 
पुढे चालवू कार्य तुझे सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।१।।

समाधी तुझी ही इथे बांधीलेली ,म्हणूनीच भूमी असे पुण्याशाली 
हवेचा इथे हा अणूरेणू पूर्ण,तुझ्या आत्मतेजे असे दिप्तीपूर्ण 
समाधिस्थ होता तुवा हा दिलेला ,करातील तो दीप आम्ही धरीला 
पुढे चालवू कार्य तूझें सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।२।।

स्मृतीने तुझ्या मात्र अश्रू गळावे,सुचावे न काही मनाशी रडावे 
पुसूनीच अश्रू पुढे जावयाते तुझा याचितो स्पर्श मी एक हाते 
मुखी नाम राहो सदा केशवाचे ,तरुनीतडा अश्मही जावयाचे 
प्रसादे तुझ्या शक्ती ती अंगी येवो समाधीपुढे प्रार्थना हीच होवो ।३।।