marathi corner

Monday, March 26, 2012

aatmasamarpaN he mam jeevan

आत्मसमर्पण हे मम जीवन
तव पदी वाहिले तन मन केतन।।धृ।।
तू राष्ट्राची मूर्त तपस्या हिंदुभूमिची एकाच आशा
संघटनेची धरुनी मानेशा चाललास तू राष्ट्र तपोधन ।।१।।
अमित शक्तीची वांच्छा  धरुनी तप अचारीच्सी राष्ट्रोद्धर णी
तुझ्या यशच्या मार्गावरुनी वितरीन माझे जीवन कणाकण ।।२।।
जीवन माझे एक जड शिला शिल्पकार तू त्यावर कुशला 
हात कसाही चालव अपुला घडवी मूर्ती सुंदर त्यातून।।३}]
राष्ट्रवान तू नभोविहारी पूजनी न मी तव अधिकारी
अर्पितसे तुज अभिमाने तरी ज्वलंत निष्ठा हेच उपायान।।४।।
अहंभाव तो कुठला आता तुझ्यामध्ये  मम विरे अस्मिता
हृदी बाणली आद्न्यांकीता तव अनुशासन हे मम भूषण।।५।\
तुझ्या प्रसादे पुनीत होता तव तेजाने मन संचरीता
संघटनेच्या विजयाकरिता करीन सेवा दिव्य चिरंतन ।।६।\
असंख्यात तव आज पदाती तुझ्या स्मितावर हलती फुलती
देत तयांना अखंड स्फूर्ती तव दृष्टीचे अमृतासिंचन ।।७।।
चढेल ध्वज हा उंच अंबरी ऐश्वर्याच्या सुवर्ण शिखरी
 हिंदू जनता कृतार्थ सारी करील तेव्हां तुज अभिनंदन।।८।।




No comments:

Post a Comment