marathi corner

Friday, March 30, 2012

sfurtigeet39

ujaLile too तममय जीवन संघायुगाचा शालिवाहन


उजळिले तू तममय जीवन संघायुगाचा शालिवाहन।धृ ।।

कर्मयोग तव ज्वलंत प्रेरक मातीतूनाही उठले सैनिक
वान सतीचे घेउनी दाहक प्रकाश फुलवीत अंधारातून।।१।।
सामर्थ्यातून तत्वाचा जय धर्म रक्षण्या शक्तीसंचय
राष्ट्र आपुले मृत्युंजय तूच दाविले निजाहवनातून।।२।।
हिंदुत्वाचा विशाल सागर विभिन्नातेच्या लाटा वरवर
परी अंतरी एकाच सुस्वर जागविले हे सत्य सनातन।।३।।
तव शब्दांचे अमृतासिंचन देशाचे या फुलले योवन
पुरुषार्थाचे जगण्या जीं अगणित सेवक झिजले कणकण।।४।।
महिमा आता संघायुगाचा विशालतेचा उदात्ततेचा
जीवन इथले बहरविण्याचा तुझी तपस्या मंगल पावन।।५।।













No comments:

Post a Comment