marathi corner

Friday, March 16, 2012

asu aamhee sukhaane patthar paayaateel

असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदीर उभाविणे हेच आमुचे शील।धृ।

आम्हास नको मुळी मानमरातब  काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही
सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयामान्दिरातील।१।

वृक्षांच्या शाखा उंच नभांतरी जावो
विश्रांतीसुखाते विहान्गावृंदा वारि घेवो
जरी देईल  टकरा नाग बलाने देवो
करू अमर पाजुनी रस पाताळातील ।२।

जरी असले अमुचे रूपाहे ओंगळवाणे
सोसून टाकीचे घाव बदलवू जिने
गुणसुमने आम्ही विकसित करू यत्नाने
पावित्र्ये जीवन का न होईल तेजाळ।३।

No comments:

Post a Comment