marathi corner

Sunday, October 16, 2011

sfurtigeete(24)

हा अखंड नंदादीप जळणार,सतत जळणार
हा असाच तेवत जगती ,नीज प्रकाश नित्य देणार!धृ !
जळत जळत जरी आत्मनाश हो,जीवन सार्थकता ही 
घोरानिराशातामाविनाश हो ध्येय अंतरी राही 
हा प्रदीप्त नंदादीप अवनीस प्रकाशाविणार!१!
चिरकाल जळत असणे इतरांसही चेतविणे 
हे कार्य सतत करणे दशदिशा प्रकाशाविणे 
आकांक्षा धरुनी चित्ती हा जळत जळत जळणार !!२!!
प्रलय वादळी मूळी न थरथरे असे ज्वलंत 
ज्वालामुखीपरी वरुनी शांत हा दया क्षमा ठेवी थोर
गंभीर मनी खंबीर प्रज्वलित राष्ट्र करणार !!३!!
एक दीप दुसर्यास चेतवी ऐसे आणि होती
जागृत हा राष्ट्रास जागवी देऊने जीवनास्फुर्ती 
हा एकाच नंदादीप पण दीपमाळ करणार!!४!!

No comments:

Post a Comment