राष्ट्रोन्नती एक मात्र ध्यान हेच चालू दे
राष्ट्रोन्नती एक मात्र ध्यान हेच चालू दे
आश्त्राजीवानात जीव जीवनांत पाहू दे!!धृ !!
सोड भोग मोह स्वार्थ देह तुझा झिजो परार्थ
चंदनी सुगंध मंद आसमंत भरू दे !!१!१
ध्येयाभाव जो मनात येऊ दे तुझ्या कृतीत
कार्याची किर्तीध्वजा दूरदेशी फडकू दे!!२!!
कर्मयोग हा ज्वलंत स्वीकारी तू नितांत
दिव्या तुझ्या हवनातूनी दीपमाळ उजळू दे!१३!!
नकोत अन्य यज्ञ याग त्याग हाच मान याग
बंदिवान आत्मतेज ,आज मुक्त होऊ दे!!४!!
No comments:
Post a Comment