marathi corner

Tuesday, October 25, 2016

sfutigeet47

संघ माझा चांगला समदा रंगला
चँग आम्ही बांधला ,भेदभाव संपला \ध्रु \\
मोकळ्या या मैदानावर वारा वाहे झुळझुळ
पावलांच्या तालावर लेझिम वाजे खुळखुळ
खराखुरा खेळ खेळू, शत्रू करू खिळखिळा \१

आट्यापाट्या हुतूतूच्या आंखल्या  या पाट्या
उठाबशा जोर काढून फिरवू या लाठ्या
खो देऊन  जुलुमाला संघ वाढू लागला ।२।
उडीसंगं चकाकतं जांबियाचा पातं
तलवारीचे वार कसे,निघती तोलात
 सरसावूनी भिडवीती ,रोखलेला भाला }३।
गावकरी कामधंदे,हाताचे सोडून
शाखेवरी धाव घेती बोलणी
संघंगाणी गावयाचा छंद त्यांना लागला ।४।
हिंदुस्थान हिंदूचा`भगवा झेंडा त्यांचा
म्होरक्याचं ऐकायचं संघ सेवकांचा
बघा बघा गाव सारा आला प्रार्थनेला ।५।



No comments:

Post a Comment