आर्त भक्तीने स्मरता केशव!कोटी जीवने तुझ्यात विरतील
आर्त भक्तीने स्मरता केशव!कोटि जीवने तुझ्यात विरतील ।।धृ।।
शांतहृदय तू विशाल सागर चारित्र्याचा शुभ्र हिमाचल
आकाशा ची तुझी भव्यता प्रसन्न जीवन गंगेचे जल।।१।।
उदरी लाव्हा रसरसलेला वरून पण ही क्षमाशीलता
त्यासम जीवन तुझे केशवा उरात ज्वाला वरून शीतल।।२।\
धुतले अमुचे मलीन जीवन धर्माबिंदूचे शिंपून तू जल
राष्ट्रभक्तीचे बीज पेरुनी तूच फुलविली धरती शामल।३।
कृतीचा धरिला तू गोवर्धन लावून त्याला कोटी बाहुबल
मातृभक्तीच्या सेतुवारुनी स्वर्ग जिंकण्या वीर धावतील ।।४।।
मातृमान्दिरी धुंद होऊनी लावूनी भाळी मातृचरणधूळ
कोटी मुखांनी तूच गरजला जय मृत्युंजय माता मंगल ।।५।\
भवितव्याच्या सागरातला स्तंभदीप तूनिर्भाय निश्चल
करोत कितीही आज उपेक्षा अखेर सारे तुलाच स्मरतील।।६।।
तुझ्या स्मृतीने जीव तगमगे नेत्रातूनी जल निर्मळ खेळते
कणाकणाने विरून व्हावे श्रद्धेया! मी अंश तुझ्यातील।।७।।