विजयाचे पद पुढे टाकिले
विजयाचे पद पुढे टाकिले
मनामानातुनी करुनी जागरण दुडूमदुडूम दुंदुभी घुमाविले !धृ!
कालोघाला स्पर्श कशाचा कमलादालाला जसा जलाचा
क्षणभर भाव न उदासातेचा चंचल चित्त ही अचल बनविले !१!
इतिहासाच्या संस्कारांनी विजय कथा त्या पुन्हा स्मरोनी
संघर्षाला सिद्ध होऊनी पहिले पाउल ठाम रोविले
प्रतिक भगवे या सर्वांचे हिमशिखरावर डूलवायाचे
अखंड भारत निनाद साचे हृदया हृदयातून गरजले!३!
व्हावी सेवा मातृभूमीची मनी आस तर समर्पणाची
जीवनापुजा ध्वजाराजाची गुरुपुजेचे गान गैएएले!४!