एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान
एक अंतरी आस अमुच्या मुखात एकच गान
देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण !!धृ!१
एक आमुची आई भारत आम्ही लेकरे सारी
भारत देश हा देव अमुचा आम्ही सर्व पुजारी!!१!!
भरतखंड हा सागर आम्ही बिंदू जलाचे त्यात
किरणेआम्ही भारत अमुचा तळपले सूर्य नभात
आम्ही सगळे एक आमुचा एक असे अभिमान!!२!!
असंख्य प्पाने आणीत शाखा वृक्ष तरीही एक
हजार जाती पंथ लक्ष तरी पिंड आमुचा एक
आम्ही सगळे एक कुणी नाच रंक राव धनवान !!३!!
मनामानातुनी देशभक्तीची ज्योत तेवते एक
देह भिन्न तरी नासानासातुनी रक्त खेळते एक
आम्ही सगळे एक आमुचे भगवे एक निशाण !!४!!