uThaa raaShTraveer ho
उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा ,उठा चला ,सशस्त्र व्हा,उठा व्हा !!धृ!!
युद्ध आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनी सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला लढू चला
उठा चला उठा चला !!१!!
लाख संकटे जरी उभी समोर थकली
मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
उठा उठा चला चला !!२!!
वायुप[उतरा होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिउनी टाकू सागरा
मन्युबळ होऊनी रणात जिंकू मृत्युला
उठा उठा चला चला !!४!!
यज्ञकुंड पेतालेप्रकॅंद हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी त्यात देऊ आहुती
देवभूमी अजिंक्य ही जगास दाखवू हला
उठा उठा चला चला!१५!!
सुंदर स्फ़ुर्तिदायक गीतकविता.
ReplyDeletehttp://www.baliraja.com
........................