kaalagateehuni बलवत्तर ही गौरवशाली माने
कालागतीहुनी बलवत्तर ही गौरवशाली माने
याच मनांच्या अमित बलावरलाख झुंजवू रणे!धृ !
शिवशक्तीचे पूजक होऊनी वीरव्रत हे अंगिकारूनी
एकाच पूजन आम्हा माहिती शिर्कामले अर्पिणे !१!
घरी वा दारी वा देशांतरी जे जे खुपते शल्य अंतरी
दूर करू ते सत्वर करुनी भीषण समरांग णे!२!
भारतभूमीचे सुपुत्र आम्ही देश वाहिला तिच्याकारणे
क्षणभरही नाच आम्हा साहवे केविलवाणे जीणे!३!
मरणाची न आम्हा भीती मारीत मरणे अमुची रीती
अमृतासुत आम्हीच जाणतो मरणाला मारणे !४!
पराभवाच्या अपमानाच्या खुणा पुसू या आक्रमणाच्या
मातृमान्दिरी पुन्हा उभारू विजयाची तोरणे !५!
No comments:
Post a Comment